Skip to content

श्री.भैरवनाथ शिक्षण व सेवा-भावी संस्था

Shri. Bhairavnath DMLT College, Korochi- Ichlakaranji

Menu

Founding President's Message

डॉ. प्रदीप पाटील

Founding President
Qualification : B.A.M.S., Ph.D.

Founding President's Message

ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यशाली गतिमान युगात आता शिकविण्याचा जमाना संपला. आता शिकावे कसे ते शिकविले पाहिजे. आज ज्ञानाच्या कक्षा नित्य रुंदावत चालल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्याने शिकविलेले पुरणार नाही. शिक्षण म्हणजे बांधून दिलेली शिदोरी असून चालणार नाही. जगाचे भवितव्य शिक्षणाशी निगडीत आहे. तर देशाचे भवितव्य नवयुवकांच्या सर्वांगिण सामर्थ्यांवर अवलंबून आहे. नवनवीन आव्हाने पेलण्याची ताकद शिक्षणात हवी. जगाची सर्वांगिण रमणीयता प्रतिक्षणाच्या नवतेत सामावली आहे.

याचे भान ठेवून आम्ही श्री भैरवनाथ DMLT कॉलेज,कोरोची या संस्थांची स्थापना केली आहे. आमच्या या शिक्षण संकुलात ज्ञानदानाबरोबरच मुलांच्या ठायी असलेल्या विविध क्षमतांचा व कौशल्यांचा कल्पकतेने पुरेपूर विकास करुन त्यांना स्व-ची जाणीव करुन देण्याचा विशेष प्रयत्न केला जातो. शिक्षणासोबत सुसंस्कार व सद्विचारांचे बिजारोपण केले जाते. विद्यार्थ्यांच्या मनात प्रबळ आत्मविश्वास व अफाट इच्छाशक्ती निर्माण करुन त्याला ध्येयवादी बनविण्याचेही पवित्र कार्य चालते.

आमच्या महाविद्यालायातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी ज्ञानसंपन्न, गुणवान, विज्ञाननिष्ठ, स्वावलंबी, राष्ट्रप्रेमी, ध्येयवादी व चारित्र्यसंपन्न बनावा यासाठी महाविद्यालय सदैव तत्पर असते. याकरीता तज्ज्ञ, अनुभवी, उच्चशिक्षित व मातृहदयी शिक्षक बंधु-भगिनींच्या कुशल मार्गदर्शनातून व विचारसंपन्न संकल्पनेतून वैविध्यपूर्ण सर्व उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मुलांच्यामध्ये असणारी उत्सुकता, उत्कंठा व जिज्ञासा जागी करुन त्यांच्या नवनिर्माणाची सात्विक क्षमता वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याकरिता वर्गातील अंतरंग आणि शिक्षकांची सर्वांगिणता अधिक सुंदर व्हावी यासाठीही संस्था तत्पर असते. केवळ अभ्यासक्रम संपविणे हा दृष्टीकोन न ठेवता मुलांना समृध्द, संपन्न व यशस्वी जीवनाच्या अनुभवाची रसदही शिक्षणातून पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

यामुळे काय होईल तर वर्गात आपल्या अवती-भोवती असणाऱ्या चैतन्याच्या स्त्रोतांना अंतरीच्या जिव्हाळ्याची आणि प्रेमाच्या उमाळ्याची उफाळी फुटेल, तो प्रेमाचा उमाळा अंतरंगात आला की, मग ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ हे निश्चितच. हा अंतरीच्या प्रेरणेचा दिवा प्रेमाच्या वातीने अन् हास्याच्या ज्योतीने सतत तेवत ठेवला तर मग प्रत्येक दिवस तुमच्या पाल्याचाच, तोच पुरस्कार विजेता आणि तुमच्यासारखे भाग्यवान पालक तुम्हीच.